हरल्यानंतर शिव ठाकरे भावूक; म्हणाला स्टॅन हा…
मुंबई | रविवारी संध्याकाळी बिग बाॅस 16चं (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले पार पडलं. त्यामुळं सध्या सर्वत्र बिग बाॅसच्या विनरची चर्चा रंगली आहे. विनर जरी एमसी स्टॅन(MC Stan) ठरला असला तरी शिव ठाकरेच(Shiv Thakare) जिंकायला पाहीजे होता असं काहींचं मत आहे.
शिव ठाकरे हरल्यानंतर त्यानं दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. शिव म्हणाला की, स्वाभाविकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप मनापासून खेळलो आणि नेहमीच चांगली कामगिरी केली.
एखाद्या मुद्द्यासाठी आवाज उठवला तसेच कोणत्याही कामात माझं बेस्ट देणं असो, या सगळ्यात मी माझं 100 टक्के दिलं आहे. मला हिंदी प्रेक्षक ओळखू लागले यातच मी समाधानी आहे, असंही शिव माध्यमांशी बोलताना म्हणाला.
अंतिम फेरीनंतर शिव म्हणाला होता की मी एक चांगला खेळाडू आहे. पण एमसी स्टॅन हा एक खरा माणूस आहे. तसेच शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन चांगले मित्रसुद्धा आहेत.
दरम्यान, सलमान खानबद्दल(Salman Khan) बोलताना शिव म्हणाला की, सलमान हा मला देवासारखा आहे. सलमानला पाहूनच मी बाॅडी बनवली. त्यामुळं सलमान खानसोबत राहून खूप आनंद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.