काॅंग्रेसचा राष्ट्रवादीला जोर का झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळं(Eknath Shinde) मोठी फूट पडली आहे. शिंदेंनी बंड केल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते शिंदे गटात गेले. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतही(NCP) हळूहळू मोठी खिंडार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या काॅंग्रेसनंच(Congress)पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

यामुळं काॅंग्रेसची मात्र काहीशी ताकद वाढली आहे, असं म्हणायला हरकत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काॅंग्रेसला याचा मोठा फायदा होऊ शकतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघ, इंदापूर तालुका, करमाळा, सोलापूर येथील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-