गुजरातच्या निकालानंतर भाजपचा ठाकरेंना थेट इशारा
मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये 182 जागांपैकी भाजप 158 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं अंतिम निकाल अजून जाहीर झाला नसला तरी गुजरातमध्ये भाजपची एकहाती सत्ता येणार, हे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या गुजरातमधील विजयाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. याच विजयावरून मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी उद्धव ठाकरेंना(Uddhv Thackeray) धारेवर धरलं आहे.
लोढा नुकतेच म्हणाले आहेत की, गुजरात ही फक्त नांदी आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही असंच घडेन, असा इशाराच लोढा यांनी ठाकरेंना दिला आहे.
यावेळी लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि अमित शाह ((Amit shah) यांचंही कौतुक यावेळी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस गुजरातमध्ये राहून प्रचार केला, तसेच गुजरातमधील कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले, त्याचाच हा विजय असंही लोढा म्हणाले.
दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच लोढा यांनी केलेल्या वक्तव्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणुक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
- मोठी बातमी! हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’?, काँग्रेस सावध
- ‘काँग्रेस नक्की जिंकेल’; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
- हिमाचल प्रदेशमध्ये भाजप अडचणीत, महाराष्ट्रातील ‘हा’ नेेेेेता पोहचला शिमल्यात
- Gujarat Election 2022 | गुजरातमध्ये मोदींची जादू कायम; पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार
Comments are closed.