फळं खाताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या सगळ्यांचेच जीवन धावपळीचं झालं आहे. या धावपळीत आपण आपल्या आहाराकडं दुर्लक्ष करतो. परंतु सात्विक आहार घेणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.

आपल्या आहारात फळांचा समावेश असणंही तितकंच गरजेचं आहे. दररोज एकतरी फळं(Fruits) खाल्लच पाहीजे. कधीकधी असंही होतं की, आपण फळे तर खातो पण अवेळी खातो किंवा चुकीच्या पद्धतीनं खातो, अशा चुकांमुळं आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात, म्हणूनच आपण फळे खाताना काय काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ.

फळं खाताना ते स्वच्छ धुणे गरजेचं आहे. तसेच इतर अन्नासोबत फळं खाणं टाळावे. कारण यामुळं पचनक्रिया मंद गतीने होऊ शकते. अन्नासोबत जर फळे खाल्ली तर शरीरात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात.

तसेच झोपण्याच्या दोन-तीन तास आधी फळं खाणेही घातक ठरू शकते. रात्री फळं खाल्ल्यास फळे शरीरात मोठ्या प्रमाणात साखर सोडू शकतात. तसेच पित्तही होऊ शकते. म्हणूनच आहारतज्ञ रात्री फळे न खाण्याचा सल्ला देतात.

फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळावं. कारण फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने तुमच्या पचनसंस्थेची पीएच पातळी बिघडू शकते. जर तुम्ही फळे खाल्ल्यानंतर पाणी पिलात तर तुम्हाला अतिसार किंवा काॅलरासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

महत्वाच्या बातम्या-