“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | अमरावतीमध्ये बचू कडू आणि राणा यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे.महायुतीमध्ये असूनही बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा विरोध करत इथे भाजपविरोधात उमेदवार उभा केला. आमदार रवी राणा आणि नवनीत यांच्यावर ते सतत वार करताना दिसून येत आहेत. त्यातच काल सायन्सकोर मैदानावरुन बचू कडू आणि राणा यांच्यात पुन्हा संघर्ष झाल्याचं दिसून आलं.

आज (24 एप्रिल) या मैदानावर अमित शाह यांची सभा होणार आहे. मात्र, सभेआधीच येथे मोठा राडा झाला. हे मैदान बचू कडू यांनी अगोदरच बुक करून त्याचे पैसे ही भरले होते. पण या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असल्याने सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी करण्यात आली. परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी?, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

यावेळी बच्चू कडू पोलिसांनाही भिडताना दिसले. या राड्यानंतर आमदार रवी राणा यांनी या सर्व घटनेला नौटंकी असं म्हटलं. यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी थेट रवी राणा यांना गंभीर इशाराच दिला. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. ही नौटंकी नसून यापुढे सोडणार नाही असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

काय म्हणाले बच्चू कडू?

‘रवी राणाला पैशांची मस्ती आलीये काय?, निवडणुका आहे म्हणून थांबलोय. आमचा थांबण्याचा स्वभाव नाही. त्यांना सगळ्यांना आडवं घेऊ आम्ही. यापुढे असं काही बोललास तर सोडणार नाही.’, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.यावेळी त्यांनी अमरावतीमधील सगळे चुकीचे प्रकार उघड करणार असंही सांगितलं.

अमरावतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु आहेत. तीन कोटींचा तर नुसता जुगार सुरू आहे. हे सगळं बाहेर काढणार. आता तर लढाई सुरू झाली आहे. अजून पुढे सगळं समोर येईल. त्यांना सगळ्यांना आडवं घेऊ आम्ही. असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत.

अमित शाह यांच्या सभेवरही बच्चू कडू यांनी टीका केली. यांनी (भाजपा) हनुमान जयंतीला जाहिरातमध्ये उपस्थित राहणाऱ्यांना हजार रुपये दिले जाईल, असं लिहिलं. त्यांनी हा सगळा बाजार मांडला आहे. खरे हिंदूत्ववादी असाल तर या बाजाराला थांबवा.राज्याचा सत्यानाश केला. धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर अमरावतीत कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही. असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

News Title : Bachchu Kadu warning to Ravi Rana

महत्त्वाच्या बातम्या-

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती