भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai l सध्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच नेतेमंडळी नवनवीन दावे करत आहेत. अशात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी देखील एक मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीस तब्बल 40 जागा मिळतील असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कधीही व कोणीही भ्रष्टाचाराबाबत तडजोड केलेली नाही :

याशिवाय आजवर मी ज्या-ज्या नेत्यांवर आरोप केले आहेत ते कधीही मागे घेतलेले नाहीत. पक्षाने राजकीय तडजोडी केल्या देखील असतील. परंतु मी कधीही भ्रष्टाचाराबाबत तडजोड केलेली नाही. माझ्या पक्षानेही एखादा नेता सोबत आला, तर पुन्हा कुठला गैरप्रकार सुद्धा होणार नाही, याची खातरजमा करूनच या नेत्यांना पक्षात घेतले असल्याचे सोमय्या बोलले आहेत.

तसेच राजकीय अपरिहार्यता म्हणून काही निर्णय घ्यावे देखील लागतात असे स्पष्टीकरण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एका मुलाखतीत दिले आहे. तसेच आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भ्रष्टाचार विरोधी काम असेच सुरूच राहणार आहे अशी स्पष्टोक्तीही सोमय्या यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा धडाका सुरू :

भाजप पक्षाने मला 2016 मध्ये मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढायचे आहेत असे सांगितले होते. अगदी तेव्हाच मी माफियाला सामोरे जात आहे हे लक्षात आले होते. मुंबई महापालिकेत भाजपने नेहमी शिवसेनेला पाठिंबा देखील दिला होता. परंतु आम्ही सत्तेत सहभागी होतो असे मात्र म्हणता येणार नाही अशा शब्दांत किरीट सोमय्या त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा धडाका सुरू असताना मी पहिली व्यक्ती होतो ज्याने राज्यात भाजपने एकटे लढावे असा विचार मांडला होता. कारण त्यावेळी मुंबई महापालिकेत ज्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता की ती कीड भाजपमध्ये देखील येऊ लागली होती. स्थायी समितीत ते स्पष्टपणे दिसत होते. म्हणून झाले ते पुरे झाले असा विचार करून आम्ही कामाला सुरुवात केली असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

News Title – Kirit Somayya Anti Corruption Campaign

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बाप लेक एकाच चित्रपटात, लेकीचं करिअर घडवण्यासाठी शाहरूखने उचललं मोठं पाऊल

“रोहित शर्मा तरी कुठे…”, ‘या’ माजी खेळाडूकडून पांड्याची पाठराखण