पुढील चार दिवस बॅंका राहणार बंद?, समोर आलं ‘हे’ कारण

मुंबई | बॅंकमध्ये (Bank) खातं असलेल्या ग्राहकांसाठी एका महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही तुमच्या बॅंकेला कोणत्याही तातडीच्या कामासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही बॅंकांच्या सुट्टया लक्षात घेतल्या पाहीजे.

28 जानेवारी रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं या दिवशी बॅंकेला सुट्टी आहे. मात्र त्यानंतर पुढील 4 दिवस सुद्धा बॅंकेला सुट्टी असणार आहे, असं माध्यमांच्या माहिती नुसार समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

या संपामध्ये बोलत असताना देशातील सर्वात मोठी बॅंक म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) म्हटलं आहे की, 30 आणि 31 जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवासांचा संप जाहीर केला. याचा फायदा त्यांच्या शाखांमधील कामगारांवर होऊ शकतो.

जाहीर केलेल्या संपामध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. पगार वाढ करावा, बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करावी तसेच नॅशनल पेंशन सिस्टम रद्द करण्यात यावी.

त्यामुळं बॅंकेला 4 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, जरी बॅंकेला सुट्या असल्या तरी सुद्धा या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कंगनाची पठाणच्या वादात उडी! बाॅलिवूडवाल्यांना दिला कठोर शब्दांत गंभीर इशारा

कारसारखी स्कूटर पण लाॅक करता येणार! Honda Activa H-Smart चे भन्नाट फिचर्स

अखेर तेजस्विनीनं केला दुनियादारीच्या दिग्दर्शकासोबतच्या नात्यावर खुलासा!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात वाढ होण्याची शक्यता

“त्यावेळी पवार साहेब अजित पवारांना एक दिवसही पक्षात ठेवणार नाहीत”