‘मग ते आधी नाही का समजलं’?, संतापलेल्या शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे | पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टीळक(Mukta Tilak) आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) यांचं निधन झाल्यानं या दोन जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पोटनिवडणुका बिनविरोधी व्हाव्या यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

पण आता या पोटनिवडणुका लढवण्याची इच्छा महाविकास आघाडीनं व्यक्त केली आहे. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं या पोटनिवडणुका बिनविरोधी पार पडणार नाहीत हे तर निश्चित झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही(Eknath Shinde) या पोटनिवडणुका बिनविरोधी व्हाव्यात असं अवाहन केलं आहे. तर चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) पत्र लिहून राजकीय पक्षांना या पोटनिवडणुका बिनविरोधी व्हाव्यात अशी विनंती करणार आहेत, असंही म्हणलं जात आहे.

आता यावर शरद पवारांनी(Sharad Pawar) कोल्हापूरमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील कोणाला पत्र लिहिणार आहेत, या बाबतीत मला माहित नाही.

पंढरपूर आणि कोल्हापूरला पोटनिवडणुका झाल्या तेव्हा त्यावेळी त्यांना हे का सुचलं नाही. आताच का त्यांना हे सुचलं कळत नाही, असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थिती केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More