आता तर उर्फीनं कमालच केली! थेट शाहरूखला प्रपोज करत घातली लग्नाची मागणी
मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्यांच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. अलीकडंच उर्फीच्या कपड्यावरून तिच्यात आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार वाद झाला आहे.
आता पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे पण यावेळी कपड्यांमुळं नाही तर बाॅलिवूडचा(Bollywood) किंग खान म्हणजेच शाहरूख खानला(Shah Rukh Khan) लग्नाची मागणी घातल्यामुळं. त्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
तर झालं असं की, पापराराझीनं उर्फीला शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटाला बाॅयकाॅट केलं जात आहे, त्याबद्दल तिचं मत विचारलं. त्यावेळी उर्फी म्हणाली की, हवं तर तुम्ही माझ्यावर बहिष्कार टाका पण शाहरूखवर नाही.
नंतर पापराझीनं विचारलं की, तुम्हाला शाहरूखला काही संदेश द्यायचा आहे का?, यावर उर्फी म्हणाली, त्याचा काय फायदा कारण त्याच्यापर्यंत ते पोहचणार नाही. त्यावर पापराझी म्हणाले की, तसं नाही, शाहरूख हे सगळं पाहतात.
मग मात्र उर्फी म्हणाली की, आय लव्ह यू शाहरूख. मला तुझी दुसरी बायको बनवं. सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘मग ते आधी नाही का समजलं’?, संतापलेल्या शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- पुढील चार दिवस बॅंका राहणार बंद?, समोर आलं ‘हे’ कारण
- Government Job | रक्षामंत्रालयात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी नोकरी
- कंगनाची पठाणच्या वादात उडी! बाॅलिवूडवाल्यांना दिला कठोर शब्दांत गंभीर इशारा
- कारसारखी स्कूटर पण लाॅक करता येणार! Honda Activa H-Smart चे भन्नाट फिचर्स
Comments are closed.