मुंबई | विरोधी पक्षातील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांवरच (Kirit Somayya) बूमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय. किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत सापडलेत.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) सातत्याने आरोप केलेल्या किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. हसन मुश्रीफांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते?, असा सवाल न्यायालयाने केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती
महत्त्वाच्या बातम्या-