सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!
मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन कर्डीयॅक अरेस्टमुळे झालं आहे.
सतीश कौशिक (Satish Kaushuik) हरियाणामधील गुरुग्राम याठिकाणी गेले होते. दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.
12 च्या दरम्यान त्यांनी फोन करुन मॅनेजरला आपल्याला श्वासोच्छवास घेण्यास अडचण होत असल्याचं सांगितलं, त्यांनतर यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं.
अभिनेते अनुपम खेर यांनी सर्वप्रथम या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत सतीश कौशिक आता या जगात नसल्याचं सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
- प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
- काळजी घ्या! ‘या’ वयोगटातील लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका
- नागालँडमध्ये आता विरोधकच नसणार; राष्ट्रवादीनेही दिली भाजपला साथ
- सर्वात मोठी बातमी; आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा
- राष्ट्रवादीचा हा बडा नेता अडचणीत; राजकीय वर्तुळात खळबळ
Comments are closed.