मोठी बातमी ! अर्थमंत्र्यांचा पॅनकार्डबाबात मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | बुधवारी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचं बजेट सादर करत आहेत. यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी भारतातील आर्थिक स्थितीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी 2024 च्या निवडणुकीचं लक्ष ठेवून सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पॅनकार्डच्या (Pancard) संबधित मोठी घोषणा केली आहे. आता देशभरात पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यापुढं तुम्ही ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापर करु शकता.

अर्थमंत्र्यांनी असं देखील सांगितलं आहे की, पॅनकार्डला आता एक व्यवसाय ओळखकर्ता बनवलं जाईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात पॅनकार्डने करु शकता. आता सर्व व्यवहारांमध्ये पॅनकार्डचा वापर केला जाईल. डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payments) देखील तुम्हाला आता पॅनकार्ड वापरता येणार आहे. यापुढं सर्व व्यवहारांमध्ये पॅनकार्ड क्रमांक देणं आवश्यक आहे.

दरम्यान, आयकर विभागाकडून भारतातील (In India) प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी केलं जातं. पॅनच्या मदतीने आयकर (income tax) भरणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळते. पॅनकार्ड जारी करण्याचा उद्देश आर्थिक माहिती ठेवणं हा देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या