Bollywood News | प्रसिद्ध अभिनेता रोनित राॅय आपल्या अभिनयाने कायम चर्चेत असतो. रोनित राॅयने पती, लेक आणि मुलगा या भूमिका चोखपणे निभावल्या आहेत. कसौटी जिंदगी की’, ‘मिस्टर बजाज’ या मालिकेतील अभिनयामुळे तो ओळखला जातो. रोनितला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. रोनित राॅय हा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भूरळ घालत असतो.
रोनित त्याच्या चाहत्यांसाठी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच तो आता त्याच्या खासगी आयुष्याबदल चर्चेत आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
रोनितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सगळीकडे चर्चा (Bollywood News) सुरु आहे. वयाच्या 58 व्या वर्षी रोनितने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. रोनितची पत्नी निलम बाॅस राॅय सोबत रोनित लग्नबंधनात अडकला आहे.
लग्नाला 20 वर्ष पूर्ण-
रोनित आणि निलम या दोघांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी अभिनेत्याने पुन्हा एकदा शाही थाटात लग्न केलं आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Bollywood News) व्हायरल होत आहेत.
रोनित आणि नीलमचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. आता 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या सोशल मीडीयावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. तर स्वतः रोनितने देखील त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये रोनित पत्नीसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. रोहितने पुन्हा लग्न केल्यामुळे चाहते त्याचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
रोनितचं दुसरं लग्न-
जोआनासोबत रोनितचं पहिलं लग्न झालं होतं. मात्र, काही कारणामुळे ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर रोनित अभिनेत्री नीलम सिंहसोबत लग्नबंधनात अडकला. एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. नीलमने ‘सिलसिला है प्यार का’, ‘सुराग’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
News Title : bollywood news gets married at the age of 58
थोडक्यात बातम्या-
Horoscope Today | ‘या’ राशीच्या लोकांना चांगले दिवस येणार, वाचा राशीभविष्य
Maharashtra Politics | आढळरावांची अजितदादांना साथ; अमोल कोल्हे म्हणाले…
Weather Update | पुन्हा पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा मोठा इशारा
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट!
Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!