Nana Patekar | लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य

Nana Patekar | आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपने देखील निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अशात अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Nana Patekar यांचं मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीवर नाना पाटेकरांनी भाष्य करत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही, असं नाना पाटेकर म्हणालेत. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. तसेच यावेळी नरेंद्र मोदी (Naredra Modi) देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले Nana Patekar?

लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील, असं भाकित वर्तवलं आहे. देशभरात मोदी सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, असं नाना पाटेकर म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत भाजपाला यश मिळालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. यामुळे नानांचं भाकित आता खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाना पाटेकर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये नाना पाटेकर एका मुलाला मारताना दिसले. पण टीका होऊ लागल्यानंतर खुद्द नाना पाटेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आणि सिनेमातील एक सीनचं शूटिंग सुरु असताना घटना घडली असं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Horoscope Today | ‘या’ राशीच्या लोकांना चांगले दिवस येणार, वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics | आढळरावांची अजितदादांना साथ; अमोल कोल्हे म्हणाले…

Weather Update | पुन्हा पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट!

Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!