Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. अशातच सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

आतापर्यंत जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं आहे. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला 24 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र सरकारने अद्यापही मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न केल्याने 20 जानेवारीपासून मुंबईत पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील सभेला संबोधित करताना दिला आहे.

Maratha Reservation | एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट

अशातच मराठा आरक्षणाच्या मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला लवकरच दिलासा देणार असल्याचं एक मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या काही दिवसात मराठा समाजाला न्याय मिळेल आणि सरकार मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे उभं आहे, असं ठाम मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.  त्यानंतर आता मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असल्याने यापुढे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना यापुढे आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आणि इतरांनी दाखल केलेली मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून त्यामुळे मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. मात्र 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मराठा आरक्षण रद्द केलं. त्यामुळे मराठा आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा अवैध ठरला. दरम्यान सरकार व इतरांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेची दखल घेत मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेसंदर्भात 24 जानेवारी 2024 ला या महत्वपूर्ण विषयावर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे मराठा समाजासह राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष असणार आहे.

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटलांची पुढील दिशा काय?

सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी दोन वेळा आमरण उपोषण केले आहे. अशातच सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 40 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. मात्र अद्यापही या महत्वपूर्ण विषयावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारी 2024 पासून मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी शनिवारी बीड येथील सभेला संबोधित करताना सांगितलं आहे. त्यामुळे सरकार या विषयावर काय तोडगा काढणार? याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!

Aishwarya Rai च्या ‘या’ गोष्टीमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अडचणीत!

IND vs SA | दिग्गजांना जमलं नाही ते रोहित शर्मा करून दाखवणार?; भारताला इतिहास रचण्याची संधी

Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज, लेक Raha ची झलक दाखवली, पाहा व्हिडीओ