Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. पुणे येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Ajit Pawar | “अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच”

उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. अमोल कोल्हे वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज सांगतो की, निवडून आणून दाखवेल, अशी गर्जनाच अजित पवारांनी केलीये.

एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, अशी टीका अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर केलीये.

Ajit Pawar | “माझ्यासोबत ज्यांना यायचं आहे, त्यांनी”

माझ्यासोबत ज्यांना यायचं आहे, त्यांनी यावं, पक्षासाठी जे योग्य असेल ते माझ्यासोबत राहून करा, दोन्ही बाजूला राहू नका, एवढंच सांगायचं आहे, असा टोलाही अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे कोल्हेंना लगावला आहे.

मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो पाडणारच, असं ओपन चॅलेंज अजितदादा यांनी यावेळी बोलताना दिल्याने खळबळ उडाली आहे. अजितदादा कोल्हे यांच्या मागे का लागले? असा सवाल केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज, लेक Raha ची झलक दाखवली, पाहा व्हिडीओ

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Lok Sabha Election | महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का!, समोर आला आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक सर्व्हे!

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?