Lok Sabha Election | महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का!, समोर आला आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक सर्व्हे!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election | देशातील लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या परीने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी भाजपने केलेली दिसतेय तर दुसरीकडे मोदींची सत्ता खेचण्यासाठी देशभरात विरोधकांची जुळवाजुळव सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच भाजप आणि मित्रपक्षांसाठी महाराष्ट्रातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सी-व्होटरने घेतलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे भाजप तसेच त्यांच्या मित्रपक्षांसाठी अत्यंत धक्कादायक आहेत, कारण यामध्ये महाराष्ट्रातील महायुतीची (Mahayuti) पिछेहाट झाल्याचं पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena-Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षांनी मिळून बनवलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागांमध्ये घसघशीत वाढ होताना पहायला मिळत आहे.

नेमके काय आहेत या सर्व्हेचे आकडे?

महाराष्ट्रात लोकसभेच्या (Lok Sabha Election) एकूण 48 जागा आहेत. या सर्व जागांचा सर्व्हे सी-व्होटरच्या वतीने करण्यात आला. यामध्ये आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर काय होईल?, याचा अंदाज घेण्यात आला. या ताज्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वात जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) झाली तर भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीला 19 ते 21 जागा मिळतील, तसेच काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळतील. तर इतरांना शून्य ते 2 जागा मिळतील, असा अंदाज सी-व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

मतांच्या टक्केवारीनूसार सुद्धा महाविकास आघाडीच पुढं-

मतांच्या टक्केवारीनुसार पाहिलं तर भाजप महायुतीला 37 टक्के तर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला 41 टक्के तर इतरांना 22 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे, महाराष्ट्रातील निकालांचा (Lok Sabha Election) परिणाम थेट देशातील निकालावर होत असतो, त्यामुळे महाराष्ट्रात जर भाजपची पीछेहाट झालेली दिसत असेल तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे.

News Title- lok sabha election shocking survey for bjp

महत्त्वाच्या बातम्या-

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?

Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण