Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Corona Virus | तीन वर्षापूर्वी देशासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा सगळ्यांचं टेंशन वाढवलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आला असून तो वेगाने पसरत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Corona Virus | नव्या व्हेरियंटचा पुण्यात शिरकाव

नवा व्हेरियंट JN1 चा पहिला रूग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. यानंतर आता पुण्यात देखील नव्या व्हेरियंटचे रूग्ण वाढत असल्याचं पहायला मिळतंय. यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केलं जात आहे. परदेशवारी करून पुन्हा पुण्यात परतलेल्या या एका व्यक्तीला कोरोनाच्या व्हेरियंटची लागण झाल्याचं कळतंय.

करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन.1च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

Corona Virus | अशी घ्या काळजी

सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणं गरजेचे आहं. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळवण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सापडलेल्या जेएन.1 च्या नऊ रुग्ण आढळले आहेत त्यातील आठ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

सगळ्यांमध्ये जेएन 1 व्हेरियंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?

Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती