Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यात गेले काही दिवस तापमान बदल होत असतानाचा चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडीने चांगलाच जोर धरला आहे. पुण्यात डिसेंबर सुरुवातीपासून दिवसेंदिवस थंडी वाढत चाललीये. दरम्यान पुण्यात पुढील दोन दिवस थंडी राहणार असल्याचं हवामान विभागाने माहिती दिली आहे.

पुण्यात थंडी वाढणार-

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. सकाळी ढगाळ वातावरण असून दिवसभर हळूहळू थंडी सुरु होते. तर पुण्यातील पाषाणमध्ये थंडी वाढली असून येथे पहाटेच्यावेळी धुक्याची चादर पाहायला मिळते.

पाषाण येथे थंडीचा कडाका आणखी तीव्र असल्याने पारा 9.7 अंशांवर स्थिरावला. दरम्यान, पुढील दोन दिवसांत किमान तापमान 12 अंशांच्या जवळपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) वर्तवला आहे.

अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम होत असताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी पुण्यातील काही भागांचं तापमान पाहिलं तर काही ठिकाणी तापमानात 12 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. तर पुण्यातील शिवाजीनगर भागात काही दिवसांपूर्वी 11.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यात दिवसभर गारठा राहणार?

शहरात थंडी सुरु झाल्यापासून किमान तापमानासह कमाल तापमानही सध्या 30 अंश आहे. आणि म्हणून फक्त रात्री आणि पहाटेच नाही तर दिवसभरही हवेत गारवा जाणवतो आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात फार बदल होणार नाही, असे संकेत देतानाच डिसेंबर अखेरीस किमान तापमान पुन्हा 15 अंशांपर्यंत राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

News Title : weather update pune climate to be cold always

थोडक्यात बातम्या-

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?

Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण