दयाबेनची अवस्था झालीय फार वाईट, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. ही मालिका सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शौ पेकी एक आहे. या शोची क्रेझ संपूर्ण भारतात आहे.

या मालिकेत दयाबेन नावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीनं(Disha Vakani) तर आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. दिशानं ही मालिका सोडून कित्येक वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रेक्षक दिशाला विसरू शकले नाहीत.

सध्या दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिशा एका बाळाला हातात धरून बसली आहे. आणि ती तिची दु:खद स्टोरी सांगत आहेत.

आता हा व्हिडीओ तिच्या खऱ्या आयुष्यातला आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु हा व्हिडीओ तिच्या खऱ्या आयुष्यातला नसून तिच्या ‘सी कंपनी’ या चित्रपटातील आहे. 2008 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दरम्यान, दिशा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत परत येणार आहे की नाही याबबात अजून कोणतीही निश्चित माहिती मिळाली नाही. दिशा सध्या तिच्या संसारात रमलेली दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-