कडाक्याच्या थंडीत ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा उलटला तरी देशातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. महाराष्ट्रातीलही काही जिल्हे थंडीने चांगलेच गारठल्याचे चित्र आहे.

त्यातच हिमवृष्टीची शक्यता लक्षात घेता देशातील डोंगराळ राज्यांत पाऊस(Rain Update) पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांतील अनेक भागांत 15 जानेवारीच्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. तसेच पूर्वेकडील राज्यांत बर्फवृष्टी आणि पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा(Meteorological Department) अंदाज आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे आणि नाशिकच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं इथं कडाक्याची थंडी पडली आहे.

दरम्यान, देशातील अनेक भागांत कडाक्याची थंडी पडल्यानं काही भागांत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागांत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-