धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना जोर का झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात 2 हजार 259 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत.

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा झटका

परळीमध्ये पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी जोर का झटका दिला. यापूर्वी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या.

पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला. तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी धनंजय मुंडे यांनी दोन ग्रामपंचायतीवर यश मिळवलं. तसेच पंकजा मुंडे यांना एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवता आलं.

यापूर्वी या तिन्ही ग्रामपंचायती पंकजा मुंडे यांच्या ताब्यात वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व होते. परंतु आता त्यांच्यकडे एक ग्रामपंचायत राहिली आहे. दरम्यान, आजच्या निकालातून हिवरा व वाणटाकळी तांडा या दोन ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निकालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण 2359 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!