आदिल प्रकरणामुळं राखीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतनं तिच्या पतीवर आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयलचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर अंधेरी न्यायालयानं आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं आदिल सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.

आदिलच्या बाबतीत रोज नवीन खुलासे करणारे व्हिडीओ समोर येत आहेत. नुकताच पुन्हा एक राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत तिनं मात्र एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात तिनं तिच्या करियर (Career) आणि भविष्यातील तिचा निर्णय सांगितला आहे.

मी राखी सावंत (Rakhi Sawant) उर्फ फातिमा आदिल खान दुर्रांनी पुन्हा उठून उभी राहिन. आदिलनं माझ मन खूप दुखावलं आहे. मी हार मानणार नाही, बिझनेस करेन,बिझनेस वुमेन बनेन. मी कमकुवत नाही आहे. मी अबला नाही, मी लढेन. आयुष्य एकच आहे. मला एकदाच मिळणार आहे. चंद्र-सुर्य एकच आहेत. आज अंधार आहे,पण उद्या प्रकाश असेल असं राखीनं आत्मविश्वासानं सांगितलं आहे.

माझ्याकडं एकच आयुष्य आहे. ते मी पूर्ण आनंदानं जगणार आहे. शून्यातून उठून उभी राहीन,असंदेखील राखी म्हणत आहे. यानंतर तिनं आदिलला एक गाणं डेडिकेट (Dedicated) करत आपली व्यथा मांडली आहे. “कस्मे वादे प्यार वफा सब, बाते है बातों का क्या, कोई किसी का नही हे झुठे,नाते हैं नातों का क्या”. हे गाणं तिनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या