गुन्हा दाखल दिल्लीत, इकडे एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बिग बॉस ओटीटीचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एका रेव्ह पार्टी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचं केंद्र दिल्ली असलं तरी महाराष्ट्रातही या गुन्ह्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात आरोप असलेल्या एल्विश यादवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीच्या आरतीला बोलावलं होतं, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे, नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का?”, असा थेट सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवसारख्या नशाबाजांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचं आदरातिथ्य केलं, त्याला शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला होता. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, ड्रग्जची विक्री करणारा, सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, त्याचं सेवन करणे आणि ते विकणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.” विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सवातला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे, यामध्ये सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, “हा एल्विश यादव… विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?”

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे गुन्हेगारांचे पर्यटनस्थळ झाले आहे का?, असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांच्या या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

दोन भाऊ, दोन वेगळ्या जाती… पुण्यातील धक्कादायक रेकॉर्ड समोर

ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”