दोन भाऊ, दोन वेगळ्या जाती… पुण्यातील धक्कादायक रेकॉर्ड समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर काल उपोषण मागे घेतलं असलं तरी देखील त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्याच बरोबर कुणबी आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी देखील केली जात आहे.

शिंदे समितीला मराठा आणि कुणबी जात एकच आहे याचे पुरावे मिळाले आहेत. दरम्यान पुण्यातील आंबेगाव येथील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दोन सख्ख्या भावांच्या शाळांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जातीची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे येथे सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. यात एका भावाच्या दाखल्यावर कुणबी तर दुसऱ्याच्या दाखल्यावर मराठा नोंद केली आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

महाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जातीची नोंद करण्यात आल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. जना कृष्णाजी आंबटकर याच्या दाखल्यावर कुणबी तर त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर याच्या दाव्यावर हिंदू मराठा अशी नोंद केली आहे.

घडलेल्याप्रकारावरुन आता शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळून आल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?