ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई |मुंबईत ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला (Thackeray) मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Mla Ravindra Waikar) यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आहे. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे.

जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा 500 कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी वायकरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे.

या प्रकरणी सर्व संशयितांची लवकरच चौकशी होणार आहे. यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिस या प्रकरणात गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत आहेत, तर ईडीकडून मनी लाँड्रिंगनुसार चौकशी करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून वायकर यांची चौकशी करण्यात आली होती.

किरीट सोमय्यांनी केला होता आरोप?

वायकरांनी बांधलेल्या हॉटेलची किंमत ही 500 कोटी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वायकरांवर आरोप केला होता. वायकरांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात ‘या’ पक्षातील नेत्याचा हात?

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक?, नेमकं काय घडलं?