भारताचे विजय पाहून पाकिस्तानची पोटदुखी वाढली, केली ही अजब मागणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई |भारतीय संघाने श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या वेगवान त्रिकूटाने श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. शामी-सिराज आणि बुमराहच्या मार्‍यापुढे लंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. लंकेचे पाच फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. भारताकडून मोहम्मद शामीने पाच विकेट घेतल्या तर सिराजनेही तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

भारताचा विजय पाहून पाकिस्तानला मिर्ची झोंबली

भारताची ही बळकट गोलंदाजी पाहून पाकिस्तानात पोटदुखी सुरु झालीये. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन रजाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला सोपवल्या जाणाऱ्या चेंडूची चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या एका शो मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.

शो मध्ये अँकरने हसन रजा यांना प्रश्न विचारला. चेंडू वेगळे असतात का?. कारण भारतीय गोलंदाजांना ज्या पद्धतीचा स्विंग मिळतोय, ते पाहून असं वाटतय की, ते बॉलिंग पीचवर गोलंदाजी करतायत. त्यांना खूप चांगला स्विंग मिळतो.

टीम इंडियाची गोलंदाजी सुरु होते, तेव्हा DRS चा निर्णयही भारताच्या बाजूने होतो. 7-8 DRS खूप क्लोज होते. त्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला. गोलंदाजीबद्दल बोलायच झाल्यास शमी-सिराज एलन डोनाल्ड, एनटिनी इतके घातक झालेत. मला वाटतं की, दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू सुद्धा बदलतो. चेंडूची तपासणी झाली पाहिजे, असं हसन रजाने म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या- 

दोन भाऊ, दोन वेगळ्या जाती… पुण्यातील धक्कादायक रेकॉर्ड समोर

ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”