‘या’ भाकिताने महाराष्ट्रात खळबळ; सरकार पडणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणामुळे (Maratha Reservation) राज्यातील महायुती सरकारची कोंडी झाली आहे. आता या सरकारच्या भवितव्याबाबत ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने मोठं भाकित केलं आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकार पडणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे.

जरांगे पाटील 24 डिसेंबर म्हणताहेत, तर सरकार 2 जानेवारी म्हणतंय. पण 31नडिसेंबरला महाराष्ट्रातील महायुती सरकार जातंय. 31 डिसेंबरपर्यंत या सरकारच्या भविष्याचा फैसला लागेल. त्यामुळे सरकार ही जबाबदारी आपल्यावर घ्यायला तयार नाही. 2 जानेवारीनंतर पाहू. हे बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार 31 डिसेंबरनंतर राज्यात राहणार नाही. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले.

सरकारला वाटलं की हे प्रकरण आता आपल्या अंगलट येईल. महाराष्ट्र पेटेल म्हणून त्यांनी पाटील यांना आश्वासन दिले आहे आणि तूर्तास हे प्रकरण थांबवले. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर आहे. महाराष्ट्र खदखदत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत शहाणपणाने 24 डिसेंबर ही तारीख दिली. तुम्ही निर्णय घ्या, असं जरांगे पाटलांनी सुचवलं, पण सरकारला निर्णय घ्यायचा नसावा. कारण आपलं मरण 31 डिसेंबरपर्यंत आहे. सरकार पडणार आहे. त्यामुळे त्यांनी जानेवारीपर्यंत ढकललं आहे, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

सरकारला कळलं आहे 31 डिसेंबरपर्यंत आपलं मुंडक उडणार आहे. त्यासाठीच त्यांनी जानेवारीपर्यंत निर्णय पुढे ढकलला आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजूनही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारला वेळ हवा आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लोकसभेचं अधिवेशन बोलावून घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडावा लागेल. आणि त्यासाठी भाजपच्या नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मोदी पंतप्रधान आहेत आणि अमित शाह गृहमंत्री आहेत. याविषयी एकही भाजपचा नेता आणि मुख्यमंत्री का बोलत नाही?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भारताचे विजय पाहून पाकिस्तानची पोटदुखी वाढली, केली ही अजब मागणी!

दोन भाऊ, दोन वेगळ्या जाती… पुण्यातील धक्कादायक रेकॉर्ड समोर

ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!