निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जळगाव | लोकसभेची निवडणूक (Loksabha election) काही महिन्यांवर येऊन पोहोचली आहे. राज्यातील सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी चालू आहे. राजकीय नेत्यांनीही त्यांच्या मतदार संघात मोर्चेबांधणी कारायला चालू केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationlist congress party) जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे ( Eknath khadase) यांनी मोठी घोषणा केली.

जर मला राष्ट्रवादी पक्षाने तिकीट दिलं तर, लोकसभेची निवडणुक लढवणार आहे. लोकसभेच्या रावेर मतदार संघातून निवडणूक लढवणार, अशी इच्छा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. सध्या या मतदार संघातून त्यांच्या सुनबाई भाजपच्या (Bjp) रक्षा खडसे (Raksha khadase ) खासदार आहेत.

नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant patil ) जळगावच्या दौवऱ्यावर आले होते. त्यावेळी रावेर मतदार संघातून एकनाथ खडसे यांनी निवडणुक लढवावी अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. लोकसभेची निवडणुक लढवण्याची माझी इच्छा नाही. मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यास ती पार पाडेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

जळगाव जिल्हाच्या राजकारणावर एकनाथ खडसे यांचा दबदबा आहे. त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे रावेर मतदार संघातून दुसऱ्यांदा खासदार आहेत. एकनाथ खडसे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर, भाजपाला निवडणुक अवघड जाईल. एकनाथ खडसे यांना रावेरमधून तिकीट मिळाल्यास सुनबाई आणि सासरे आमने सामने दिसतील.

रावेर लोकसभा मतदारसंघ(Rver Lok Sabha Constituency) भाजपचा अजिंक्य बालेकिल्ला राहिला आहे1989 मध्ये या मतदारसंघाची रचना झाली. तेव्हापासून दहा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यापैकी नऊ निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. केवळ एकाच निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकनाथ खडसे भाजपच्या गडाला सुरुंग लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता