Eye Care Tips lआजकाल मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा परिणाम डोळ्यांवर होताना दिसत आहे. तसेच वाढते वय देखील डोळ्यांच्या समस्यासाठी कारणीभूत ठरू शकते. बदलती जीवनशैली पाहता सकस आहार शरीरासाठी उपयुक्त असतो. मात्र शरीरामध्ये त्याची कमतरता भासत असते. मात्र वाढत्या वयाबरोबरच आपण डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
विशेषत: जेव्हा तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी प्रवेश करत असाल. त्यावेळी दैनंदिन गोष्टींचा डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी (Eye Care Tips) घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हीही वयाच्या 40 व्या वर्षी प्रवेश करणार असाल आणि तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे निरोगी डोळे ठेवण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेऊयात…
डोळ्यांची तपासणी :
वयाच्या चाळिशीनंतर डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांमध्ये होणारी कोणतीही समस्या वेळेत लक्षात येईल आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
Eye Care Tips l पोषक तत्वांनी युक्त आहार घ्या :
डोळ्यांचे आरोग्य सुधारवायचे असेल तर आहार सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे आहारात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा (Eye Care Tips) समावेश करा. तसेच आहारात व्हिटॅमिन सी, हिरव्या पालेभाज्या आणि मासे, पालक, संत्री यासारख्या गोष्टींचा समावेश करावा.
हायड्रेटेड राहा :
डोळ्यांच्या निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेट राहणे गरजेचे आहे. डोळ्यांसह संपूर्ण शरीरातील अवयवांसाठी पुरेसे पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या (Eye Care Tips) दूर होते, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
धूम्रपान सोडा :
सर्वात महत्वाचं म्हणजे धूम्रपान हे अनेक (Eye Care Tips) आजारांचे मुख्य कारण आहे. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक नर्व्ह डॅमेज, दृष्टी कमी होणे आणि अंधत्वाची समस्या वाढते. यामुळे धूम्रपान सोडणे महत्वाचे आहे.
Eye Care Tips l स्क्रीन टाइम मॅनेज करा :
आजकाल मोबाईलचा अतिवापर होताना आपल्याला दिसत आहे. मात्र मोबाईल आपल्या डोळ्यांसाठी अत्यन्त हानिकारक आहे. मोबाईल स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहण्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळा.
महत्त्वाच्या बातम्या –
Rashibhavishya l मकर संक्रांतीपासून नशीब बदलणार, या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस
Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी; आता तुमचा खिसा होणार रिकामा!
Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग
Hanuman Movie: बड्या बड्या सिनेमांना जमलं नाही ते हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!
Amitabh Bachchan यांनी असं काय केलं, ज्यामुळे रडायला लागले होते शक्ती कपूर!