Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Stock Market | भारतीय शेअर बाजार (Stock Market) सोमवारी गुंतवणूकदारांना खुशखबर देऊन बंद झाला. बाजार सोमवारी विक्रमी पातळीवर बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) 30 शेअर्सचा सेन्सेक्स 759.94 अंकांच्या उसळीसह 73,327.94 च्या पातळीवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 202.90 अंकांच्या वाढीसह 22,097.45 च्या पातळीवर बंद झाला. बाजारातील वाढीमध्ये आयटीच्या शेअर्संनी मोठी भूमिका बजावली असताना, आठवड्याच्या पहिल्या दिवशी 5 समभागांमध्ये (Shares) मोठी वाढ दिसून आली.

IRFC च्या गुंतवणूकदारांची चांदी

सोमवारी पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्यामध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी (IRFC) पहिल्या स्थानावर राहिली, IRFC चा शेअर 14.76 टक्क्यांनी वाढला. 1.70 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचे शेअर्स सकाळी 9.15 वाजता 116.20 रुपयांच्या पातळीवर उघडले आणि 134.70 रुपयांच्या उच्चांकावर गेले. शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 130.11 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

Stock Market सुसाट, IREDA Share ची कमाल

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या शेअरने (IREDA Share) देखील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कमाल केली. हा शेअर दुसऱ्या क्रमांकाच्या तेजीसह, 10 टक्क्यांच्या वाढीसह 122.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला तो 111.85 रुपयांच्या पातळीवर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो 122.10 रुपयांच्या दिवसाच्या उच्च पातळीवर बंद झाला. या कंपनीचे बाजार भांडवल (IREDA MCap) 32740 कोटी रुपये आहे आणि अलीकडेच तिचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. त्यामुळे कमी काळातच कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले.

Wipro चा रॉकेट शेअर

सोमवारी शेअर बाजारातील तिसरा सर्वाधिक चर्चेत राहिलेला शेअर म्हणजे विप्रो लिमिटेडचा शेअर… विप्रो लिमिटेडचा शेअर (Wipro Ltd Share) दिवसभराच्या व्यवहारानंतर 6.25 टक्क्यांच्या वाढीसह 494.55 रुपयांवर बंद झाला. या आयटी स्टॉकची किंमत सोमवारी एकाच दिवसांत 29.65 रुपयांनी वाढली. सकाळी 9.15 वाजता बाजार उघडला तेव्हा तो 10 टक्क्यांनी झेप घेऊन 526 रुपयांच्या पातळीवर गेला होता. मात्र, व्यवहार बंद होण्याच्या शेवटच्या तासांमध्ये त्याची गती थोडी कमी झाली.

तेल-गॅस कंपनीचा शेअर सुसाट

चौथ्या नंबरवर तेल-गॅस कंपनीचा शेअर राहिला. जो 4.57 टक्क्यांनी वाढून 233.55 रुपयांवर बंद झाला. सोमवारी ओएनजीसी शेअरचा भाव सुमारे 10 रुपयांनी वाढला. शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला ONGC चा शेअर 229.20 रुपयांवर उघडला आणि 235.40 रुपयांवर पोहोचला. ही पातळी देखील या कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी ठरली असून या कंपनीचे बाजार मूल्य 2.94 लाख कोटी एवढे आहे.

Lic कडून गुंतवणूकदारांना सुखद धक्का

दरम्यान, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात LIC च्या शेअर्सने देखील सोमवारी आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले. LIC चा शेअर 3.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सोमवारी बाजार उघडला तेव्हा तो त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्च पातळीला स्पर्श करत राहिला. खरं तर जेव्हा बाजार उघडला तेव्हा एलआयसीचा शेअर 842.25 रुपयांवर उघडला आणि काही मिनिटांतच तो 862.45 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 863 रुपये आहे. व्यवहाराच्या अखेरीस एलआयसीचे शेअर्स 854.75 रुपयांवर बंद झाले.

 महत्त्वाच्या बातम्या –

Rashibhavishya l मकर संक्रांतीपासून नशीब बदलणार, या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी; आता तुमचा खिसा होणार रिकामा!

Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग

Hanuman Movie: बड्या बड्या सिनेमांना जमलं नाही ते हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!

Amitabh Bachchan यांनी असं काय केलं, ज्यामुळे रडायला लागले होते शक्ती कपूर!