Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी; आता तुमचा खिसा होणार रिकामा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jio And Airtel | जिओ आणि एअरटेल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कारण 5G इंटरनेट वापरणाऱ्या करोडो भारतीय ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. तुम्ही जर 5G मोफत वापरत असाल तर ही ऑफर या वर्षी संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे झाल्यास ग्राहकांना 5G वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे Jio आणि Airtel च्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल त्यांचे अमर्यादित 5G डेटा प्लॅन बंद करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. कंपन्यांकडून हे पाऊल 2024 च्या उत्तरार्धात उचलले जाऊ शकते. आगामी काळात 5G इंटरनेट मोफत वापरणे कठीण होऊ शकते. रिलायन्स जिओ आणि एअरटेल 2024 च्या उत्तरार्धात अमर्यादित 5G ऑफर बंद करू शकतात.

नफा वाढवण्यासाठी उचलणार पाऊल

याशिवाय मोबाईल रिचार्जची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या नफा वाढवण्यासाठी ही पावले उचलू शकतात. तसेच यंदा मोबाईल रिचार्ज करणाऱ्या लोकांच्या खिशावरचा बोजाही वाढू शकतो. ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन रिचार्ज योजना आता सुरू असलेल्या 4G रिचार्ज दरांपेक्षा किमान 5-10% महाग असू शकतात. असे केल्यास कंपनीला चांगला नफा मिळेल, महसूल वाढेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात 5G सेवा सुरू केली. तेव्हापासून दोन्ही कंपन्या सध्याच्या 4G दरांवर 5G इंटरनेट सेवा देत आहेत. अमर्यादित 5G डेटासाठी ग्राहकांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेतले जात नाही. खरं तर हळू हळू विनामूल्य अमर्यादित 5G इंटरनेट ऑफरचे युग संपुष्टात येत आहे. एकूणच मोफत 5G इंटरनेटची सेवा फार काळ टिकणार नाही.

Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील दोन्ही आघाडीच्या दूरसंचार कंपन्या देशभरात 5G सेवेचे कव्हरेज देण्याचा विचार करत आहेत. आता त्यांची कमाई वाढवण्यावर त्यांचे लक्ष असणार आहे. भारतात 5G क्रांती आणण्याचे श्रेय रिलायन्स जिओ आणि एअरटेलला देखील दिले जाते. दोन्ही कंपन्यांनी देशात 5G सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. देशभरात सुमारे 12.5 कोटी 5G वापरणारे ग्राहक आहेत.

मात्र, 2024 च्या अखेरीस भारतातील 5G वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो. या वर्षाच्या अखेरीस 5G ​​वापरणाऱ्यांची संख्या 20 कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे 5G प्लॅन सध्याच्या 4G प्लॅनपेक्षा 5-10 टक्के महाग होऊ शकतात. याशिवाय दोन्ही कंपन्या 30-40 टक्के अधिक डेटा देऊ शकतात, जेणेकरून लोक पैसे देऊन 5G सेवा स्वीकारू शकतील आणि कंपन्यांचा मार्केट शेअर वाढू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या –

Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग

Hanuman Movie: बड्या बड्या सिनेमांना जमलं नाही ते हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!

Amitabh Bachchan यांनी असं काय केलं, ज्यामुळे रडायला लागले होते शक्ती कपूर!

Viral Video Clips । चालत्या गाडीवर ‘चलो इश्क लढाये’! पाहा तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ

Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर