Amitabh Bachchan | बॉलिवूड म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी मनोरंजनाचे प्रमुख साधन. बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट, त्यांचे किस्से, वाद आणि कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात घडत असलेल्या घडामोडी यांमध्ये चाहत्यांना रस असतो. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आतापर्यंत अनेक खलनायक झाले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे शक्ती कपूर. शक्ती कपूर हे नाव ऐकताच चाहत्यांच्या मनात धास्ती भरायची. त्याची कारणं अनेक आहेत, मग तो क्राइम मिस्टर गोगो असो वा नंदू… शक्ती कपूर यांची सर्वच पात्र भुरळ घालणारी आहेत.
शक्ती कपूर यांनी खलनायकाची भूमिका अनेकदा पार पडली. त्यांना नायकाला त्रास देताना तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल. पण वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूर स्वत: फार लवकर नाराज होतात. होय, कारण मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत असे काही केले होते की त्यांना अश्रू अनावर झाले होते.
‘सत्ते पे सत्ता’मधील गोष्ट
दरम्यान, ही गोष्ट 1982 मध्ये आलेल्या ‘सत्ते पे सत्ता’ बद्दल आहे. या चित्रपटात शक्ती कपूर यांनी मंगल आनंदची भूमिका साकारली होती. या ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन राज एन सिप्पी यांनी केले होते. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, रंजीता, शक्ती कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी या चित्रपटात काम केले होते. शक्ती कपूर यांनी चित्रपटातील एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी एक विनोद केला जो ऐकून शक्ती कपूर यांना रडू कोसळले.
सत्ते पे सत्ता या चित्रपटात ‘दुक्की पे दुक्की हो’ हे एक गाणं आहे. सर्व कलाकार या गाण्यासाठी शूटिंग करत होते. या गाण्यात दुसरा डायलॉग शक्ती कपूर यांचा होता. अशा परिस्थितीत शक्ती कपूर त्यांच्या सीनची वाट पाहू लागले. वाट पाहत असतानाच शक्ती कपूर यांच्या लक्षात आले की अमिताभ बच्चन यांनी त्यांचा डायलॉग बोलला. तेव्हा शक्ती कपूर खूप घाबरले होते.
Amitabh Bachchan जेव्हा मस्करी करतात…
शक्ती कपूर सांगतात की, मला वाटले होते की जर अमिताभ बच्चन माझे डायलॉग बोलत असतील तर माझे करिअर संपेल. मला वाटायचे की, ते एक स्टार आहेत आणि काहीही करू शकतात. त्यांनी माझा डायलॉग बोलला म्हणून मी दिग्दर्शकापर्यंत पोहोचलो होतो. मी त्याला म्हणालो, हे बरोबर नाही. माझ्याशिवाय बाकीचे सहा कलाकार बसले होते. तितक्यात सर्वांनी मला रडताना पाहिले आणि टाळ्या वाजवायला सुरूवात केली. तेव्हा अमिताभ म्हणाले की, “साले मजाक किया था.”
खरं तर तीन दशकांपूर्वी गाण्याच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी शक्ती कपूर यांचा डायलॉग बोलला होता. तेव्हा कपूर खूप घाबरले होते. अमिताभ यांनी आपली जागा घेतली, आपल्याला आता काम मिळेल का अशा शंका त्यांच्या मनात येऊ लागल्या होत्या.
परंतु, अमिताभ शक्ती कपूर यांचा डायलॉग बोलत होते तेव्हा कॅमेरा सुरू नव्हता. शक्ती कपूर यांनी खुलासा करताना सांगितले की, अमिताभ हा सीन करताना गंभीर दिसले पण ते मस्करी करत होते हे मला माहिती नव्हते. त्यामुळे सर्वांनी माझी खिल्ली उडवली. नंतर मग शूटिंगला सुरूवात झाली. मग अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला शक्ती कपूर यांचा हा सीन 3-4 वेळा करायला लावला.
महत्त्वाच्या बातम्या –
Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर
Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ फेम अनिकाला मिळाला रियल लाईफ ‘शिवाय’; लवकरच करणार लग्न
Black Pepper | ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर करा ‘हा’ सोपा उपाय
Bigg Boss 17 | सासऱ्याचं नाव घेत अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!