Black Pepper | ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर करा ‘हा’ सोपा उपाय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Black Pepper | फास्ट फुड, बदललेली जीवनशैली यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यातच हाय ब्लड प्रेशर ही समस्या तर सामान्यच झाली आहे. बऱ्याचदा तरूण देखील या समस्येचा सामना करत असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष दिलं, आहाराकडे लक्ष दिलं की, या समस्या टळतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, आरोग्याकडे अजूनच लक्ष देणं गरजेचं असतं. हाय ब्लड प्रेशर या समस्येवर एक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

भारतीय किचनमध्ये सहजपणे मिळून जाणारे काळे मिरेचे (Black Pepper) फायदे ऐकून तुम्हीही एक वेळ विचार कराल, की आपल्याला ही माहिती एवढ्या उशिरा कशी काय कळली. काळे मिरेमध्ये असणारे पोषक तत्व आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. त्यातच काळे मिरे हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये करू शकते. असे ही फायदेशीर काळे मिरेबाबत अधिक जाणून घेऊयात.

काळे मिरे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करेल?

काळे मिरेमध्ये (Black Pepper) असणारे तत्व अँटीऑक्सीडेंटचं काम करतात. काळे मिरे शरीरात रक्ताच्या नसा पसरवण्यास मदत करतं, यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. काळे मिरेमध्ये असणारे ‘पाइपरीन’ ही रसायन धमन्यांना आराम देतात. यामुळे रक्त प्रवाह सुरळित चालू राहतो.

काळे मिरे मध्ये असणारे पोटॅशियम ब्लड प्रेशरला कमी करते यासोबतच सोडियमचे संतुलनही राखते. याचा दैनंदिन जीवनात रोज वापर केला तर, तुम्हाला याचा फरक जाणवेल. रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास पाण्यात एक दोन काळी मिरे ठेचून टाकली तर या पाण्याचा खूप फायदा होतो. रोज याचे सेवन केले तर, हाय बीपीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Black Pepper चे फायदे

काळे मिरे (Black Pepper) फक्त ब्लड प्रेशरच नाही तर, वजन घटवण्यासही मदत करते. यामुळे पचन शक्तिपचन शक्ती सुधारते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासही काळे मिरे फायदेशीर ठरते.

काळे मिरे खाल्ल्याने ताण-तणाव कमी होतो. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात मध आणि काळे मिरे टाकून पिणे कधीही फायद्याचे ठरू शकते. काळे मिरेमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे केस गळती किंवा केस कमजोर होणे यासारख्या समस्या दुर होतात. त्यामुळे असे बहुगुणी काळे मिरे आहारात असायलाच हवे.

महत्वाच्या बातम्या- 

TMKOC | बबीताजीबद्दल बोलतानाचा जेठालालचा व्हिडीओ तूफान व्हायरल!

Fighter Trailer | ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज; ऋतिक-दीपिका नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची एंट्रीच भाव खाऊन गेली

Bigg Boss 17 | सुशांतचं नाव ऐकताच विकी जैन भडकला, अंकिताला खडसावलं

Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल