Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ फेम अनिकाला मिळाला रियल लाईफ ‘शिवाय’

Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ या मालिकेत ‘अनिका’चा रोल करणारी अभिनेत्री सुरभी चंदनाला (Surbhi Chandna)रियल लाईफ शिवाय मिळाला आहे. सुरभी चंदना बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही गेल्या 13 वर्षांपासून एक मेकांना डेट करत आहेत.

सुरभी चंदनाने (Surbhi Chandna) सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. चाहत्यांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. ‘इश्कबाज’ या मालिकेत अनिका आणि शिवाय यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. या मालिकेत अभिनेता नकुल मेहता मुख्य भुमिकेत होता. या दोघांची जोडी तेव्हा प्रचंड हीट झाली होती. यातीलच अनिका म्हणजेच सुरभी आता लवकरच लग्न करणार आहे. तिच्या चाहत्यांना या निर्णयाचा खूप आनंद झाला आहे.

Surbhi Chandna ची पोस्ट |

सुरभीने (Surbhi Chandna) इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंड सोबत दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्राही दिसून येत आहे. हे फोटो पोस्ट करत तीने ’13 वर्षांपासून त्याच्या आयुष्यात रंग भरत आहे. आमच्या फोरएव्हरची सुरुवात आता होत आहे.
#Estd2010″, असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic)

सुरभीच्या या पोस्टनंतर तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनीष मल्होत्रा पासून टीव्हीमधील प्रसिद्ध कलाकार तीच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री सुरभी ज्योतीने कमेंट मध्ये लिहिले, ‘अभिनंदन माझी चंदू’, तर, दृष्टी धामीने लिहिले की, ‘अभिनंदन लव्ह’ यासोबतच जय भानुशाली, करण ग्रोवर, अर्जुन बिजलानी, पारुल चौधरी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Surbhi Chandna ला ‘इश्कबाज’ पासून मिळाली प्रसिद्धी

2009 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेपासून सुरभी चंदनाच्या (Surbhi Chandna) करिअरची सुरुवात झाली. यात तीने ‘स्विटी’ नावाचा एक छोटासा रोल केला होता. TMKOC च्या चाहत्यांना हा एपिसोड चांगलाच ठाऊक असेल. स्विटी बनून जेठालालला ती कशी फसवते, या सीनमध्ये सुरभी दिसून आली होती.

यानंतर 2016 मध्ये आलेल्या ‘इश्कबाज’ या मालिकेत सुरभीला ‘अनिका’ची भूमिका मिळाली. अनिकाचा रोल तेव्हा प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या मालिकेपासूनच तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती ‘शेरदिल शेरगिल’मध्ये दिसून आली होती. आता लग्नाच्या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. मात्र, लग्न कधी करणार याबाबत तीने अद्याप कोणताच खुलासा केला नाहीये.

महत्वाच्या बातम्या- 

Deepika Padukone च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी!

Ram Mandir | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत कोटींची डील?, आकडा ऐकून थक्क व्हाल

UPI संबंधित 5 नवीन नियम, जाणून घ्या अन्यथा होईल मोठं नुकसान

Madhuri Dixit च्या लवलाईफ बद्दल सर्वात मोठा खुलासा!

TMKOC | बबीताजीबद्दल बोलतानाचा जेठालालचा व्हिडीओ तूफान व्हायरल!