Madhuri Dixit च्या लवलाईफ बद्दल सर्वात मोठा खुलासा!

Madhuri Dixit | बाॅलिवूडची धकधक गर्ल म्हणून चर्चेत असणारी अभिनेत्री माधूरी दिक्षीत (Madhuri Dixit) कायम उतकृष्ट अभिनयामुळे चर्चेत असते. माधूरीने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने घर केलं. या काळात माधूरीच्या चित्रपटांची क्रेज वेगळी होती. माधुरीचा एखादा चित्रपट बाक्सऑफिसवर आला का तो हिट होणारच याचा अंदाज तिच्या चाहत्यांना होता. मात्र, माधूरी तिच्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच पर्सनल लाईफमध्ये सुद्धा अनेक वेळा चर्चेत आली आहे. शिवाय तिच्या प्रेम प्रकरणाबदल सुद्धा अनेक चर्चा रंगल्या होत्या.

काय आहे नेमका प्रकार?

माधूरी दिक्षीतचं (Madhuri Dixit) लग्न जरी डाॅक्टर नेने यांच्यासोबत झालं असलं तरी मात्र इंडस्ट्रीमध्ये तिच्या प्रेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. माधुरीचं नाव बाॅलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्याबरोबर जोडलं होतं. तो दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संजय दत्त होता. संजय दत्त आणि माधूरी दिक्षीत यांच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

माधुरी आणि संजय दत्त यांनी काही चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम देखील बहरलं, असं अनेकदा सांगण्यात देखील आलं होतं.

पुढे काय घडलं?

माधूरी आणि संजय दत्त यांचा खलानायक हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर तूफान हिट झाला होता. या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्या नात्याच्या देखील चर्चा रंगत होत्या. मात्र याची भीती ‘खलनायक’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घाई यांना सतावत होती.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर, त्याचा वाईट परिणार सिनेमाच्या कथेवर झाला असता, अशी भीती सुभाष घई यांना होती. कारण सिनेमात दोघे एकमेकांचे शत्रू होते. मनात असलेली भीती कमी करण्यासाठी सुभाष घई यांनी एक युक्ती शोधून काढली.

सुभाष घई यांनी एक करार केला आणि हा करार संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या दोघांनी देखील मान्य केला. चित्रपट पूर्णपणे तयार होऊन प्रदर्शित होईपर्यंत दोघेही एकमेकांशी लग्न करणार नाहीत, असे या करारात स्पष्ट लिहिलं होतं. कारण दोघांचं लग्न झालं असतं, तर त्याचा फटका सिनेमाला बसला असता. लोकांचं लक्ष दिग्दर्शकांना माधुरी दीक्षित आणि संजय दत्तकडे वळवायचं नव्हतं.

News Title : Madhuri Dixit’s love affair’s biggest revelation

महत्त्वाच्या बातम्या-

TMKOC | बबीताजीबद्दल बोलतानाचा जेठालालचा व्हिडीओ तूफान व्हायरल!

Fighter Trailer | ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज; ऋतिक-दीपिका नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची एंट्रीच भाव खाऊन गेली

Bigg Boss 17 | सुशांतचं नाव ऐकताच विकी जैन भडकला, अंकिताला खडसावलं

Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल