Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai News | महाराष्ट्रात सगळीकडे संक्रात सणाचा उत्साह बघायला मिळत आहे. राज्यात ठिक ठिकाणी संक्रात मोठ्या उत्साहमध्ये पार पडत असल्याचं चित्र आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील राज्यभरात तरुणांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतल्याचं पाहयला मिळत आहे. मात्र पतंग उडवताना राज्याच्या अनेक भागात पतंगाच्या मांज्या मुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला. असाच धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली.

नेमकं काय घडलं?

राज्यात अनेक भागात संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, हा उत्साह काही जणांच्या जिवावर बेतला आहे. चुक नसताना देखील काहींना जीव गमवावा लागलाय. मुंबई (Mumbai News) येथील बोरवीलीमध्ये 21 वर्षीय तरुणाला मांज्यामुळे आपला प्राण गामवावा लागला. मोहम्मद फारुकी असं या तरुणांचं नाव आहे. 

दरम्यान, मोहम्मद त्याच्या दुचाकीवरुन जात असताना हा प्रकार घडला. दुपारी मोहम्मद दुचाकीवरुन जात असताना अचानक त्याच्या गळ्याला मांजा गुंडळला गेला.

बोरीवलीमध्ये एका इमारतीच्या टेरेसवरुन काही अज्ञात पंतग उडवत होते, आणि याच वेळेस त्यांच्या पतांगाचा मांजा मोहम्मदच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. त्याच वेळेस मोहम्मद गाडीवरुन कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

पुढे काय घडलं?

दरम्यान, मोहम्मदची काही चुकी नसताना त्याला ऐन सणासुदीच्या दिवशी आपला प्राण गमवावा लागल्याने घडलेल्या प्रकारवरुन मुंबईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, या सगळया प्रकाराचा मुंबई पोलिसांनी आढावा घेतल्यानंतर पतंग उडवणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूनुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

 

News Title : mumbai news shocking news for mumbai city

महत्त्वाच्या बातम्या-

Black Pepper | ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर करा ‘हा’ सोपा उपाय

Bigg Boss 17 | सासऱ्याचं नाव घेत अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Sania Mirza शोएब मलिकसोबत घटस्फोट घेणार?; उचललं मोठं पाऊल

Deepika Padukone च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी!

Ram Mandir | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत कोटींची डील?, आकडा ऐकून थक्क व्हाल