Bigg Boss 17 | सासऱ्याचं नाव घेत अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Bigg Boss 17 | बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या वैवाहिक आयुष्याचा तमाशा झाल्यासारखंच म्हणावं लागेल. यांच्यातील भांडणं काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. आता तर विकी जैनच्या वडिलांनी थेट अंकिता लोखंडेच्या आईची औकातच काढली आहे. याबाबत स्वतः अंकिताने खुलासा केला.

बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये सहभागी झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी अंकिता आणि विकी यांच्यात प्रचंड भांडणं झाली. त्यात सुशांत सिंह आणि अंकिताच्या रिलेशनशिपचा मुद्दाही बराच गाजला. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अंकिताने विकीला लाथ मारली होती. यानंतर विकीच्या वडिलांनी थेट वंदना लोखंडे यांना फोन करून खडेबोल सुनावले असल्याचं अंकिताने सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंकितासह तिचं संपूर्ण कुटुंबच चर्चेत आलं आहे.

Bigg Boss 17 | अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

बिग बॉसच्या (Bigg Boss 17) घरात अंकिता पती विकी जैनशी याबाबत बोलतानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. बाबांनी माझ्या आईला फोन केला होता. त्यांनी माझ्या आईला तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला असं मारत होता का?, असा प्रश्न केला. एवढंच नाही तर, तुमची औकात काय आहे.. असे अपशब्द वापरले, असं अंकिता विकीला या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

पुढे ती म्हणाली, माझी आई एकटीच आहे. माझ्या वडिलांचं आताच निधन झालं आहे. मला हे सगळं ऐकून फार वाईट वाटलं. मी आईची माफीही मागितली. बाबांनी आईला अजून अपशब्द वापरले. पण मी आईला शांत राहायचं म्हटलं., असा खुलासा अंकिताने पती विकी जैनसमोर केला. हे सगळं ऐकत असताना विकी मात्र अगदी शांतपणे काहीतरी खात होता. त्यांच्या या संवादाचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

Bigg Boss 17 | अंकिता-विकीच्या कुटुंबात प्रचंड वाद

काही दिवसांपुर्वी बिग बॉसच्या (Bigg Boss 17) फॅमिली वीकमध्ये विकी जैनची आई बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी सून अंकितावर बरेच आरोप केले होते. यानंतर सोशल मीडियावर अंकिताच्या सासूला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. यावर बऱ्याच जणांनी प्रतिक्रियाही दिली. नंतर पुढच्या फॅमिली वीकमध्ये अंकिताची आई वंदना लोखंडे याही बिग बॉसमध्ये आल्या होत्या. त्यांनी अंकिताला यावेळी मोलाचा सल्ला दिला.

अंकिता बिग बॉसच्या (Bigg Boss 17) घरात सतत तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंहचा उल्लेख करत असते. मात्र, सतत सुशांतचं नाव विकीच्या कुटुंबाला खटकत असल्याचं वंदना लोखंडे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सुशांतचा उल्लेख करणं बंद कर, असा सल्ला त्यांनी लेकीला दिला होता. आता पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे अंकिता आणि विकीच्या कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Fighter Trailer | ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज; ऋतिक-दीपिका नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची एंट्रीच भाव खाऊन गेली

Bigg Boss 17 | सुशांतचं नाव ऐकताच विकी जैन भडकला, अंकिताला खडसावलं

Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु