Ram Mandir | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत कोटींची डील?, आकडा ऐकून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातून दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे देशातील संपूर्ण वातावरण राममय झालं आहे. मात्र त्यापुर्वीच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अयोध्येत केलेल्या एका डीलची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये तब्बल 14.5 कोटींचा व्यवहार केल्याचं म्हटलं जात आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापुर्वीच (Ram Mandir) त्यांनी घर बनवण्यासाठी अयोध्येमध्ये 14.5 कोटींचा फ्लॅट घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनंदन लोढा यांच्यासोबत बच्चन यांनी डील केली आहे.

अमिताभ बच्चन यांचा अयोध्येत कोटींचा व्यवहार

अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन लोढा यांच्या 14.5 ‘7-स्टार एन्क्लेव द शरयू ‘ येथे एक फ्लॅट विकत घेतला आहे. बच्चन यांनी 10,000 चौरस फुटांचं घर विकत घेतलं आहे. प्रोजेक्ट शरयूचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. याच दिवशी राम मंदिराचंही (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. तब्बल 51 एकर जागेत हा शरयू प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी विकत घेतलेली जागा ही राम मंदिरपासून अवघ्या 15 मिनिट अंतरावर आहे. तर, येथून विमानतळ अवघ्या 30 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या या डीलची जोरदार चर्चा होत आहे. राम मंदिर उद्घाटनामुळे अयोध्येचं भविष्यात मोठं महत्व वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जागेच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचाच विचार करत अमिताभ बच्चन यांनी येथे जागा खरेदी केली आहे.

Ram Mandir | अयोध्येत रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत

राम मंदिरामुळे (Ram Mandir) अयोध्येत रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या जबरदस्त तेजी आली आहे. देश- विदेशातील मोठे हॉटेल व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अयोध्येमध्ये मालमत्ता खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आयोध्येमध्ये सध्या जमिनी आणि इमारतीच्या किमती चार ते दहा पट वाढल्या आहेत.

राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनामुळे या ठिकाणी व्यावसायिक जमीन घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. यासोबतच स्थानिक लोकही तेथे जमीन खरेदी करून व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. मात्र अशातच येथील मालमत्तांचा भाव वधारतच चालला आहे. त्यामुळे अयोध्येत याचीही चर्चा रंगू लागली आहे. एका अहवालानुसार, अयोध्या (Ayodhya Ram Mandir) शहराच्या बाहेर मालमत्तांच्या किमती 1500 रुपये चौरस फुटावरून तीन हजार रुपये चौरस फूट झाल्या आहेत. शहरामध्ये तर यात अजूनच वाढ झाली आहे. हेच दर शहरात चार हजार रुपयांवरून सहा हजार रुपयांवर गेले आहेत. या किंमती अजून वाढणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Business Ideas l तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हे 5 व्यवसाय; आठवड्याला कमवाल हजारो रुपये

Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल

Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु

Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा