Deepika Padukone च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी!

Deepika Padukone | बाॅलिवूडची मस्तानी म्हणून चर्चेत असणारी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आपल्या चाहत्यांसाठी रोेज नवनवीन फोटोज शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. आपल्या खासगी आयुष्याबाबत देखील दिपीका चर्चेचा विषय ठरत असते. काॅफी विथ करण या रिएलीटी शो मध्ये तिच्या नात्याबदल तिला विचारण्यात आलं होतं. मात्र तिने काही असं उत्तर दिलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. सोशल मीडियावर दीपिकाची फॅन फोलोइंग काही कमी नाहीये. शिवाय चाहत्यांसाठी सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.

दीपिका पादुकोणने शेअर केली पोस्ट-

दीपिकाने (Deepika Padukone) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फायटर चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा दिल्या आहेत.

या वेळी ती म्हणाली की, स्क्वाड्रनला मिस करत आहे, या सोबतच तिने टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दीपिकाने पोस्टमध्ये काही इमोजी शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने आजारी पडल्याचं सांगितले आहे. आता दीपिका पादुकोण हिची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

deepika viral post jpg

नव्या चित्रपटात झळकणार दिपीका-

दिपीकाच्या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना उत्सुक्ता होती. हा चित्रपट अत्यंत खास आहे. कारण ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे पहिल्यांदाच एकसोबत धमाका करताना दिसणार आहेत. 250 कोटी या चित्रपटाचे बजेट असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रपट नक्कीच हीट ठरणार-

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि ऋतिक यांच्या डायलॉगमुळे चित्रपट नक्कीच हीट ठरेल, असं म्हटलं जात आहे. ट्रेलरमधूनच प्रत्येकाची देशभक्ती जागी होईल, असे सीन दाखवण्यात आले आहेत. चित्रपटातील गाणी तर अगोदरच चर्चेत आहेत. मात्र आता ट्रेलरनेही धुमाकूळ घातला आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या (Fighter Trailer) या चित्रपटात दीपिका पादुकोणने मिनल राठोड उर्फ मिन्नी यांची भूमिका साकारली आहे. तर, ऋतिक रोशनने शमशेर पठानिया उर्फ पैटी यांची भूमिका केली आहे. दीपिका आणि ऋतिक रोशन यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूरही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ ​​रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय करण सिंह ग्रोवर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

News Title : deepika padukone shares a post on social media

महत्त्वाच्या बातम्या-

Ram Mandir | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत कोटींची डील?, आकडा ऐकून थक्क व्हाल

UPI संबंधित 5 नवीन नियम, जाणून घ्या अन्यथा होईल मोठं नुकसान

Madhuri Dixit च्या लवलाईफ बद्दल सर्वात मोठा खुलासा!

TMKOC | बबीताजीबद्दल बोलतानाचा जेठालालचा व्हिडीओ तूफान व्हायरल!

Fighter Trailer | ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज; ऋतिक-दीपिका नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची एंट्रीच भाव खाऊन गेली