Hanuman Movie: बड्या बड्या सिनेमांना जमलं नाही ते हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hanuman Movie | सध्या बॉक्स ऑफिसवर हनुमान चित्रपटाचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. साऊथ चित्रपट हिंदी भाषिक तसेच भारतातील विविध राज्यांमध्ये चांगले चालतात याचा प्रत्यय अनेकदा आला. किंबहुना मागील काही वर्षात साऊथ चित्रपटांनी बॉलिवूडला चांगलीच टक्कर दिली. 2024 या वर्षाच्या सुरूवातीला देखील साऊथचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. (Hanuman Box Office Collection) 12 जानेवारीला साऊथचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले.

धनुषचा ‘कॅप्टन मिलर’, महेश बाबूचा गुंटूर ‘कारम’ आणि तेजा सज्जाचा ‘हनुमान’ हे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. ‘हनुमान’ या चित्रपटाने सुरूवातीच्या तीन दिवसांमध्येच चांगलाच गल्ला कमावला. या तीन दिवसांत तेजा सज्जाने महेश बाबू आणि धनुषसोबत चांगली कामगिरी केली. तेजा सज्जाच्या ‘हनुमान’ने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर सर्व ताकद दाखवून दिली आहे.

हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!

त्यामुळे हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला. चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ‘हनुमान’ने तीन दिवसांतच बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. चार दिवसांत हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. परंत, ‘हनुमान’ने अवघ्या तीन दिवसांत बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे.

जे चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 30 दिवसांतही करू शकले नाहीत, ते तेजा सज्जाच्या ‘हनुमान’ने अवघ्या 3 दिवसांत करून दाखवले. विकेंडचा फायदा हनुमान या चित्रपटाला झाला. हे आम्ही नाही तर तीन दिवसांची आकडेवारीच सर्वकाही सांगत आहोत. 12 जानेवारीला तेजा सज्जाचा ‘हनुमान’ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला.

मात्र, पहिल्या दिवसापासून निर्मात्यांसाठी अनेक निगेटिव्ह बातम्या येत राहिल्या. असे असूनही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. लाइव्ह ट्रॅकर सकनिल्‍कच्‍या एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 8.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशी 12.45 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई केली.

Hanuman Movie चा दबदबा

दरम्यान, तेजा सज्जाच्या ‘हनुमान’च्या कमाईवर नजर टाकली तर ती आताच्या घडीला 40.65 कोटीच्या घरात आहे. दुसरीकडे धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’च्या तीन दिवसांच्या कलेक्शनबद्दल भाष्य करायचे झाले तर तो 23.40 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ देखील बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत 68.9 कोटींची कमाई केली आहे. मात्र, महेश बाबूच्या सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लक्षणीय घट झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

Amitabh Bachchan यांनी असं काय केलं, ज्यामुळे रडायला लागले होते शक्ती कपूर!

Viral Video Clips । चालत्या गाडीवर ‘चलो इश्क लढाये’! पाहा तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ

Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर

Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ फेम अनिकाला मिळाला रियल लाईफ ‘शिवाय’; लवकरच करणार लग्न

Black Pepper | ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर करा ‘हा’ सोपा उपाय