Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरूद्ध मायदेशात तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतून भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे मोठ्या कालावधीनंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याला विराट कोहली मुकला होता. पण इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विराट दिसला अन् त्याने साजेशी खेळी केली. खरं तर 2022 च्या ट्वेंटी-22 विश्वचषकानंतर विराट कोहलीने पहिलाच ट्वेंटी-20 सामना खेळला.

वन डे विश्वचषक 2023 च्या पार्श्वभूमीवर विराट आणि रोहितला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून दूर ठेवण्यात आले होते. पण, आगामी ट्वेंटी-20 विश्वचषक पाहता दोन्हीही दिग्गजांचे संघात पुनरागमन झाले आहे. मोठ्या कालावधीनंतर ट्वेंटी-20 मध्ये परतलेल्या किंग कोहलीने त्याच्या फलंदाजीच्या शैलीत काहीसा बदल केला. विराटची यावरून स्तुती होत आहे, तर काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

किंग कोहलीचे पुनरागमन

भारतीय संघ ट्वेंटी-20 विश्वचषकाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला असून विराट कोहली नव्या अवतारात दिसत आहे. विराट कोहलीने आपल्या फलंदाजीच्या शैलीत फारसा बदल करू नये, असे मत माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले. अफगाणिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराटचा आक्रमक पवित्रा दिसला होता. याचाच दाखला देत चोप्राने कोहलीला हा सल्ला दिला.

दरम्यान, विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात केवळ 16 चेंडूत 29 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या मालिकेपूर्वी विराट कोहलीचा स्ट्राईक रेट खूपच खराब असून, तो ट्वेंटी-20 च्या नव्या पद्धतीसाठी योग्य नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत एक नवीन रूप दाखवले.

Virat Kohli चा आक्रमक पवित्रा

किंग कोहलीने ट्वेंटी-20 क्रिकेटसाठी फायदेशीर असते अशी स्फोटक खेळी करण्यावर भर दिला. मात्र विराट कोहलीला फार काही बदलण्याची गरज नाही, असे मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचे मांडले. तो म्हणाला की विराट कोहली आधीच ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 140 आहे. अशा परिस्थितीत तो ज्या प्रकारची भूमिका बजावतो, ते पाहता त्याचा स्ट्राईक रेट खूपच चांगला आहे.

विराट कोहलीने खेळण्याच्या शैलीत बदल केल्यास त्याला आता ज्या पद्धतीने धावा करता येत आहेत त्याप्रमाणे सातत्याने धावा करणे कठीण जाईल, असे आकाश चोप्राने नमूद केले. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असतील यात शंका नाही, असेही चोप्राने सांगितले.

भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या वर्षी जूनमध्ये खेळल्या जाणार्‍या ट्वेंटी-20 विश्वचषकाची तयारी टीम इंडिया या मालिकेतून करत आहे. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्माला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातेही उघडता आले नाही. सलामीच्या सामन्यात रोहित धावबाद झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याचा त्रिफळा उडाला.

महत्त्वाच्या बातम्या –

Hanuman Movie: बड्या बड्या सिनेमांना जमलं नाही ते हनुमाननं फक्त 3 दिवसांत करुन दाखवलं!

Amitabh Bachchan यांनी असं काय केलं, ज्यामुळे रडायला लागले होते शक्ती कपूर!

Viral Video Clips । चालत्या गाडीवर ‘चलो इश्क लढाये’! पाहा तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ

Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर

Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ फेम अनिकाला मिळाला रियल लाईफ ‘शिवाय’; लवकरच करणार लग्न