Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Inflation l वाढत्या महागाईने पाकिस्तान देश पूर्णतः होरपळला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे (Inflation) जनता देखील त्रस्त झाली आहे. अशातच देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे सर्वत्र वारे वाहत आहेत. मात्र देशातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी लोक चिंतेत असल्याचे दिसत आहेत.

वाढत्या महागाईच्या पार्शवभूमीवर रिपोटर्सच्या माहितीनुसार, पंजाबची प्रांतीय राजधानी लाहोरमध्ये अंड्यांची किंमत 400 रुपये प्रति डझन झाली आहे. अंड्याचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. अंड्याच्या वाढत्या दरासोबतच कांद्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत.

Inflation l शासनाकडून अधिकृत दर यादीचे पालन करत नसल्याचे उघडकीस :

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात शासनाकडून अधिकृत दर यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासन त्याची योग्य अंमलबजावणी करत नसल्याने ही अडचण येत असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानात सरकारने 175 रुपये प्रति किलो कांद्याचा दर ( Pakistan Inflation) ठरवण्यात आला होता. मात्र स्थानिक प्रश्नसंचया गलथान कारभारामुळे कांद्याचे दर तब्बल 230 ते 250 प्रति किलोने विकले जात आहेत.

चिकन तब्बल 615 रुपये किलो :

पाकिस्तानात केवळ अंडी आणि कांद्याचेच दर वाढले नाही (Inflation) तर यासोबतच चिकनचे भाव गगनाला भिडले असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रिपोर्टनुसार, लाहोरमध्ये एक किलो चिकन 615 रुपयांना मिळत आहे. याशिवाय दैनंदिन वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच वस्तूंवर सातत्याने महागाईचा फटका देशातील जनतेला बसत आहे.

यासह पाकिस्तानात दूध 213 रुपये प्रतिलिटर, तर तांदूळ 328 रुपये किलोने विकला जात आहे. फळांबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सफरचंदाचा भाव 273 रुपयांवर पोहोचला आहे, तर टोमॅटो 200 रुपये किलोने विकला जात आहे.

Inflation l ईसीसीच्या आदेशांचे पालन केले जात नाही :

गेल्या महिन्यात आर्थिक समन्वय समितीने (ECC) राष्ट्रीय किंमत देखरेख समिती (NPMC) ला किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि साठवणूक आणि नफेखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी प्रांतीय सरकारांशी नियमित समन्वय सुरू ठेवण्याचे निर्देश बैठकीत दिले होते. मात्र बैठीकीत झालेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बैठक महसूल आणि आर्थिक व्यवहार खात्याचे कार्यवाहक फेडरल मंत्री शमशाद अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Rashibhavishya l मकर संक्रांतीपासून नशीब बदलणार, या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी; आता तुमचा खिसा होणार रिकामा!

Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग