Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Reliance | रिलायन्स उद्योग समूहाने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Induustries) भागधारकांसाठी मागील आठवडा चांगला ठरला. अंबानींच्या या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 90,000 कोटींहून अधिक रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 542.3 अंक अर्थात 0.75 टक्क्यांनी वाढ नोंदवली. त्यानंतर सेन्सेक्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला.

5 कंपन्यांची 1.99 लाख कोटी रुपयांची कमाई

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात सेन्सेक्सच्या (Sensex) टॉप-10 सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी 5 (Top-10 Firms Market Cap) कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे आणि त्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 1,99,111.06 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत मुकेश अंबानींची रिलायन्स आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त लाभ देणाऱ्या कंपन्यांमध्ये अव्वल स्थानावर राहिली. तर, सर्वात जास्त नुकसान एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचे झाले.

Reliance-TCS च्या गुंतवणूकदारांची चांदी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप (Reliance MCap) 90,220.4 कोटी रुपयांनी वाढून 18,53,865.17 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिलायन्सप्रमाणेच टाटा समूहाच्या टीसीएसनेही गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. कंपनीचे बाजार भांडवल (TCS Market Cap) 14,20,333.97 कोटी रुपये झाले आहे. एकूणच TCS मध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांच्या संपत्तीत एका आठवड्यात 52,672.04 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

तसेच मागच्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्य 32,913.04 कोटींनी वाढले आणि इन्फोसिसचे मार्केट कॅप 6,69,135.15 कोटी झाले आहे. भारती एअरटेलचे बाजार मूल्य (Bharti Airtel MCap) 16,452.93 कोटी रुपयांनी वाढून 6,05,299.02 कोटी रुपयांवर पोहोचले. तर, ICICI बँकेचे बाजार मूल्य (ICICI Bank MCap) 6,852.65 कोटी रुपयांनी वाढून 7,04,210.07 कोटी रुपये झाले आहे.

HDFC बँकेसह मोठ्या कंपन्यांचे नुकसान

दरम्यान, मागील आठवड्यात काही कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या हाती निराशा आली. त्यातीलच एक नाव म्हणजे एचडीएफसी बँक. ज्या पाच कंपन्यांचे मार्केट कॅप घसरले आहे त्यात एचडीएफसी बँक पहिल्या क्रमांकावर होती. HDFC चे बाजार भांडवल (HDFC Bank MCap) 32,609.73 कोटींनी घसरून 12,44,825.83 कोटी झाले आहे. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हरचे (HUL MCap) मार्केट कॅप 17,633.68 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,98,029.72 कोटी रुपयांवर आले. याशिवाय LIC चे मार्केट कॅप 9,519.13 कोटी रुपयांनी कमी होऊन ते 5,24,563.68 कोटी रुपयांवर घसरले. एकूणच नामांकित कंपन्यांना मागील आठवड्यात तोटा सहन करावा लागला. ITC च्या बाजार भांडवलात 9,107.19 कोटी रुपयांची घट नोंदवण्यात आली असून ती किंमत आताच्या घडीला 5,82,111.90 कोटी रुपयांवर आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI Market Cap) बाजार मूल्य 7,228.94 कोटी रुपयांनी घसरून 5,65,597.28 कोटी रुपये झाले.

Reliance देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी

बाजार भांडवलात घसरण झालेल्या पाच कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 76,098.67 कोटी रुपयांची घट झाली आहे. बाजार मूल्याच्या बाबतीत, रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या आठवड्यातही देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी राहिली. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एसबीआय आणि एलआयसी या कंपन्यांचा क्रमांक लागतो.

 महत्त्वाच्या बातम्या –

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Rashibhavishya l मकर संक्रांतीपासून नशीब बदलणार, या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Jio And Airtel वापरणारांसाठी धोक्याची बातमी; आता तुमचा खिसा होणार रिकामा!

Virat Kohli तू एवढा फास्ट खेळू नकोस, अन्यथा…! दिग्गज खेळाडूनं दिली वॅार्निंग