ऐकावं ते नवलच! आता Toilet करताना सुद्धा वाटणार नाही एकटं, मारता येणार गप्पा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Toilet | मोबाईलच्या जगात हरवून गेलेला माणूस केवळ शरीराने एकटा असू शकतो, असे बोलले जाते. कारण ज्याच्याकडे मोबाईल आहे, तो त्याचा वापर करण्यात अवगत असेल तर त्याद्वारे तो कुठेही रमून जातो. त्यामुळे एकटेपणा वाटत नाही किंबहुना ती भावना मनात येत नाही. पण, तुम्ही कधी कल्पना केली आहे का? की Toilet  सीट देखील तुमच्याशी बोलू शकतात? याचे उत्तर आहे होय, हे आता शक्य आहे. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

पण, यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून अधिक पैसे खर्च करावे लागतील. खरं तर CES 2024 दरम्यान (Consumer Electronics Show) जुन्या प्लंबिंगचे उत्पादन निर्माण करणाऱ्या कंपनी कोहलरने (Kohler) एक Toilet सीट सादर केली. ही टॉयलेट सीट खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया इतर आश्चर्यकारक वैशिष्ट्यांबद्दल आणि किमतीबद्दल.

कोहलर या कंपनीने PureWash E930 नावाची स्मार्ट टॉयलेट सीट सादर केली आहे. त्याची किंमत सुमारे 1,77,000 रुपये एवढी आहे. हे US मध्ये प्री-ऑर्डरसाठी काही सवलतीच्या किमतीवर उपलब्ध आहे. Alexa आणि Google Assistant तुमच्या ऑर्डर घेऊ शकतात. या टॉयलेट सीटमध्ये इतके अप्रतिम स्मार्ट फीचर्स आहेत ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही. त्यामुळेच याची किंमत लाखोच्या घरात आहे.

कव्हरची आपोआप उघडझाप

कोहलर कंपनी सांगते की, ही प्युअरवॉश बिडेट सीट एका बारीक आणि कमी-प्रोफाइल डिझाइनमध्ये साफसफाई प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जेव्हा त्याला हालचाल जाणवते तेव्हा बिडेट सीट आपोआप उघडते आणि कव्हर बंद करते. हे त्याच्यातील यूव्ही लाइट वापरून सेल्फ-क्लीनिंग मोडसह येते.

तसेच या टॉयलेट सीटवर बसून स्मार्ट सीट हँड्स-फ्री नियंत्रित करण्यासाठी तुम्ही ॲलेक्सा किंवा गुगल असिस्टंट देखील वापरू शकता. स्मार्ट टॉयलेटला कमांड देऊन त्याला चालू-बंद करता येते. याशिवाय एअर ड्रायर ॲक्टिव्ह करू शकता आणि साफसफाई देखील करू शकता. या स्मार्ट टॉयलेटमध्ये तापमान आणि दाब देखील ॲडजस्ट केले जाते.

Toilet ची सर्वत्र चर्चा

दरम्यान, कोहलरच्या या टॉयलेट सीटमध्ये हीटिंग वैशिष्ट्य देखील आहे. यामध्ये वेगवेगळे स्प्रे मोड देखील आहेत. ज्यांना व्हॉईस कमांड्स वापरायचे नाहीत, त्यांच्यासाठी ही टॉयलेट सीट मॅन्युअल वापरासाठी रिमोट कंट्रोलसह प्रदान करण्यात आली आहे. रात्रीच्या दिव्याप्रमाणे या सीटमध्ये एलईडी लाईटही देण्यात आली आहे. या सीटमध्ये क्विएट-क्लोज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, ज्यामुळे सीट घसरण्यापासून संरक्षण करते. इतकेच नाही तर साफसफाईसाठी क्विक रिलीज फंक्शन देखील आहे. या टॉयलेट सीटमध्ये चाइल्ड मोड देखील देण्यात आला आहे, जो लहान मुलांसाठी जेंटल वॉश ऑफर करतो.

महत्त्वाच्या बातम्या –

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Rashibhavishya l मकर संक्रांतीपासून नशीब बदलणार, या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस