कसब्यातील भाजपच्या पराभवावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा ( Kasba ) मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) हे विजयी झाले आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

रविवार-शुक्रवार पेठ तसेच लोहियानगर आणि मोमिनपुरा भागातून रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केलं. सरतेशेवटी रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना 11 हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवलं आहे. भाजपच्या पराभवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाना पटोले यांचं विधानसभेत अभिनंदन केलं. तसेच त्यांना खोचक टोला लगावला आहे. तिन राज्याच्या निवडणुका झाल्या काँग्रेस कुठे दिसत नाही. कसब्याचा निकाल मान्य करावाच लागलेच पण तुम्ही देखील चिंचवडचा निकाल मान्य करा, असं फडणवीस म्हणालेत.

भाजपने मला उमेदवारी दिली होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. मला का स्वीकारले नाही याबाबत मी आत्मचिंतन करेल. या निवडणुकीत मी कमी पडलो आहे. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. 2009 पासून हा संमिश्र असलेला हा मतदार झाला आहे. ही जागा सलग भाजपने जिंकली असली तरी यावेळी तिरंगी लढत झाली आहे, असं रासने म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-