एकटा पठ्ठ्या भाजपला नडला; कसब्यात इतिहास घडला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यातून पोस्टल मतमोजणीदरम्यान पहिला कल हाती आला आहे. मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.

भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत.

पुण्याच्या पेठांमधूनदेखील रवींद्र धंगेकरांना आघाडी मिळाल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली आहे. शनिवार पेठ आणि बाकी काही पेठांवर भाजपच्या हेमंत रासने यांचं वर्चस्व आहे. मात्र याच भागातून धंगेकर यांनी आघाडी घेतल्याने भाजपचं टेन्शन काही प्रमाणात वाढलं आहे. 

कसबा पेठेतील भाजपचं वर्चस्व असलेल्या सदाशिव पेठे, नारायण पेठ आणि शनिवार पेठेत जनतेचे भाजपला डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भागातही धंगेकरांनाच जास्त मतं मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-