मुंबई | हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं वक्तव्य करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भोवणार असल्याचं चित्रं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत.
संजय राऊत (Sanjay Raut) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी विधिमंडळ नाही, चोर मंडळ असा शब्द प्रयोग केला. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो, असं संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांना राऊत यांच्या या विधानाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं.
संजय राऊत हे भरकटले आहेत. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे डिक्शनरीतून रोज नवा शब्द शोधून काढून बोलत आहेत. त्यांच्या तोंडाला करवंदीचा काटा लावला पाहिजे. आता आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करतोय, असं गोगावले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- ‘माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही…’; राऊतांवर बोलताना गोगावलेंची जीभ घसरली
- टेम्पो चालकाचा मुलगा होणार DSP, MPSC परीक्षेत प्रमोद चौगुले दुसऱ्यांदा अव्वल
- भाजपचा महाविकास आघाडीला धक्का!
- पुन्हा घोळ; बारावीच्या ‘या’ प्रश्नपत्रिकेमुळे मोठा गोंधळ
- ‘अंकल अंकल काकीला सांगीन…’; अजित पवारांनी सभागृहात ‘या’ नेत्याला डिवचलं