मुंबई | खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘चोरमंडळ’हा शब्द वापरला. त्यांच्या या वक्तव्याचे विधिमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटले.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी केली. यावर बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला.
माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही XXXX नसायला पाहिजे, असं गोगावले म्हणाले. गोगावले यांच्या वक्तव्यावर ठाकरेगटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आक्षेप घेतला.
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी ती क्लीप ऐकली आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. ती मर्यादा ओलांडल्यानंतर ‘अती तेथे माती’, हे ठरलेले असते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आलाच पाहिजे, असं गोगावले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-