जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

नवी दिल्ली | सध्या टेलीकाॅम कंपन्यांपैकी जिओ(Jio) ही देशातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील काही प्लॅन अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळं जिओचं सिमकार्ड वापरायला अनेकजण पसंती देतात.

आपण आता जिओच्या काही खास प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. जिओच्या 209 रूपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुम्हाला दररोज 1 GB डेटा दिला जातो. तसेच हाय स्पीड डेटा संपल्यावर इंटरनेटचं स्पीड कमी होऊन, 64 Kbps होतं. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमीटेड काॅल्स आणि रोज 100 SMS देखील दिले जातात.

जिओचा 179 रूपयांचा प्रीपेड प्लॅन देखील सगळ्यांना परवडणारा आहे. या प्लॅनमध्येही दिवसाला 1 GB डेटा तसेच अनलिमीटेड काॅल्स आणि दिवसाला १०० SMS दिले जातात. परंतु या प्लॅनची वैलिडिटी फक्त 24 दिवसांची असते. तसेच या प्लॅनसोबत JioTv, JioCinema, jioCloud,JioSecurity चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

जिओचा 149 रूपयांचा प्रीपेड प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्येही दररोज 1 GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड काॅल्स आणि १०० SMS चा लाभ देखील मिळतो. वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनसोबतही JioTv, JioCinema, jioCloud,JioSecurity चे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.

जिओ कंपनीचे वरील सांगितलेले प्लॅन सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. तसेच जीओचे असंख्य ग्राहक देशभरात आहेत. त्यामुळं जिओ ही सध्या आघाडीची टेलीकाॅम कंपनी ठरत आहेत.

जिओच्या या प्लॅनप्रमाणेच इतर टेलीकाॅम कंपन्यांनी देखील आपल्या ग्राहकांना स्वस्त प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. Bharti Airtel आणि Vadafone Idea (VI) या कंपन्यांचे देखील काही रिचार्ज प्लॅन देखील सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.

महत्वाच्या बातम्या-